18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रनितीन गडकरी हे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेते

नितीन गडकरी हे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेते

एकमत ऑनलाईन

पुणे :े लोकशाही ही सत्ताधारी आणि विरोधक यांच्या समन्वयाने चालत असते. देश आणि राज्याचा विकास होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राला आदर्श राजकारणाचा मोठा वारसा लाभला आहे. आदर्श राजकारणाचे एक उदाहरण पुन्हा पुण्यातील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पहायला मिळाले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात. राजकारणातील आजातशत्रू व्यक्तीमत्त्व म्हणून सुद्धा नितीन गडकरी यांची ओळखले आहे. पुण्यातील विविध विकास कामाचे उद्धाटन करण्यासाठी नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेते या शब्दात सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांची स्तुती केली आहे.

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात पुण्यासह राज्यातील विविध विकास कामांच्या गतीबद्दल सांगितले आहे. पुण्यातील वाहतूकीची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

नितीन गडकरी म्हणजे राजकारणातील सुसंस्कृत नेते आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. कात्रज रोडवरील उड्डाण पुलाच्या उद्धाटनाच्या या कार्यक्रमात जोरदार राजकीय संस्कृतपणा पहायला मिळाला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या