33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home राष्ट्रीय नितिन गडकरी : देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील हेच लक्ष्य

नितिन गडकरी : देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील हेच लक्ष्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – ज्या पद्धतीने आपण कोरोनाची लढाई लढत आहोत. त्याच पद्धतीने आपण आर्थिक लढाईदेखील लढत आहोत. यामुळेच सरकारने आर्थिक पॅकेज जारी केले आहे. आपण लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू. आपली निर्यात वाढेल आणि देशात कॅपिटल इन्व्हेस्टमेंटदेखील वाढेल. सरकार निर्यात वाढविण्यावर काम करत आहे. यामुळे देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील. हेच आमचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. ते ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

तपास पूर्ण होईपर्यंत आपण यावर काहीही बोलणे योग्य नाही
नितिन गडकरी म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आपला तपास केला आहे. सीबीआयचाही तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आपण यावर काहीही बोलणे योग्य नाही. रिपोर्ट आल्याशिवाय आपण यावर कुठलेही भाष्य करणे योग्य नाही.

आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला
कोरोना संकटावर बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले, कोरोना लढाईच्या काळात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. उद्योग क्षेत्र, परिवहन आदींचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, हे वैश्विक संकट आहे. आपण लवकरच यातून बाहेर पडू आणि आपल्याला कोरोनाची लस मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

माझ्यासाठी प्रार्थना करा : रुग्णालयात रवाना होताना संजय दत्त झाला भावुक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या