16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयनितीन गडकरी यांची तब्येत बिघडली

नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली

एकमत ऑनलाईन

कोलकाता : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत एका कार्यक्रमादरम्यान अचानक बिघडली. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी इथल्या डागापूरमधील कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर जवळच्या रुग्णालयाचं पथक कार्यक्रमस्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी सिलीगुडीमध्ये १२०६ कोटी रुपये खर्चाच्या 3 ठऌ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर सुकना इथलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं पथक पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या