पाटणा : नीती आयोगाची बैठक सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार नाहीत. एका महिन्यात दुस-यांदा पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत.
यामुळे जेडीयू आणि भाजपमध्ये सर्व ठीक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोनातून बरे झाले आहेत. पण ते दिल्लीला जाणार नाहीत.