31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeराष्ट्रीयनितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत

चिराग-तेजस्वी यादव यांचा दोघांचाही दावा

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी पार पडला. मात्र मतदान चालू असतानाच राजदचे नेत तेजस्वी यादव तसेच लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी निवडणुकीचे निकाल कसेही आले तरी नितिशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा केला आहे.

शेवटच्या टप्प्याच्या प्रचारात मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असून अंत भला तो सब भला अशी भावनिक साद घालत मतदारांवर प्रभाव टाकला. मात्र शनिवारी तिसºया टप्प्यातील मतदान सुरु असताना राजदचे तेजस्वी यादव व लोजपाचे चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्यावरच निशाणा साधला. ‘नितीश कुमार आता पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरुढ होऊ शकणार नाहीत’ अशी प्रतिक्रिया चिराग पासवान यांनी दिली. ‘बिहारचे लोक बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट संकल्पनेशी जोडून राहतील’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे तेजस्वी यादव यांनीही ‘बिहारची जनता बिहारच्या भविष्याचा निर्णय घेत’ असल्याचे म्हटले आहे. ‘नितीश कुमार आता थकले आहेत. राज्याचे नेतृत्व करण्यात ते आता सक्षम नाहीत’ अशी टीकाही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

लातूर जिल्ह्यात उरले फक्त ५२६ रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या