21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयनितीश कुमारांच्या पलटीने ‘मविआ’मध्ये चैतन्य संचारले!

नितीश कुमारांच्या पलटीने ‘मविआ’मध्ये चैतन्य संचारले!

एकमत ऑनलाईन

मुंबई : बिहारच्या राजकारणातील बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएपासून वेगळे होऊन नवीन आघाडी स्थापन केली. त्यात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावे दल, हिंदुस्थानी अवाम मोर्चा यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांचा यात समावेश होता. ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर या नेत्यांनी सुमारे तासभर चर्चा केली. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या राजीनाम्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कोणताही संपर्क झालेला नव्हता.

एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ठाकरे यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी एकजूट का आवश््यक आहे, हे समजून घेण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे मत आहे. कायद्याची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे, मात्र तिन्ही पक्ष एकत्र राहून एकत्र निवडणूक लढले तर राज्यातील राजकीय फायदाही त्यांच्याच बाजूने होईल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, नितीश कुमार विरोधी पक्षांमध्ये सामील झाल्याने राष्ट्रीय पातळीवरही बिहारचे राजकीय चित्र बदलले आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर परिस्थिती बदलू शकते असे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, मात्र शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर हे सरकार पडले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या