22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर नितीश यांचा पलटवार

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर नितीश यांचा पलटवार

एकमत ऑनलाईन

पाटना : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचा-यांना वाचवणारे सरकार या टिकेवर नितीश कुमारांनी प्रत्यूत्तर दिले आहे. नितीश कुमार म्हणाले केंद्रात कोण आहे, ते काय बोलत आहेत. त्यावर आम्ही लक्ष देत नाही. एवढेच नाही तर नितीश कुमार म्हणाले की, ते भ्रष्टाचा-यांना वाचवत नाहीत. त्यापेक्षा त्यांना इकडे-तिकडे इतर राज्यांत आणण्यासाठी जे काही काम सुरू आहे, यावर मोदींनी याचा विचार करायला हवा.

दरम्यान मोदी गुरूवारी केरळ दौ-यावर गेले होते. यावेळी मोदी म्हणाले देशात भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात कारवाही केल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात ध्रुवीकरण होत आहे. काही राजकारणी लोक भ्रष्टाचाराच्या आरोपात आडकले आहेत. पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य आशा वेळी आले आहे की, देशात विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली अटकेत आहेत. अशातच मोदींनी लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे. त्यावर नितीश कुमार यांनी ही मोदींवर नाव न घेता टिका केली आहे, ते म्हणाले केंद्रातील काही लोक काहीही बोलत असतात, त्यावर आम्ही लक्ष देत नाही. भ्रष्टाचारी लोकांना कोण वाचवत आहे हे देशाला महित आहे.

राज्याराज्यात विरोधी सरकार मधील लोकांना भाजप मध्ये आणण्यासाठी काय काय चालू आहे. नितीश यांचा आरोप झारखंड-दिल्लीसारख्या राज्यात भाजप करत असलेल्या घोडे बाजारावर आरोपा होता. यावर आरजेडी नेता तेजस्वी यादव म्हणाले, भाजपच्या १००० हजार पेक्षा जास्त आमदार आणि ३०० पेक्षा जास्त खासदार आहेत. ८ वर्षात त्याच्यांतील एकाच्या तरी घरावर छापा पडला का? भाजपचे नेते दुधाने धुतलेले आहेत काय. जर त्याच्या घरावर छापे पडत नसतील तर. त्याना कोण वाचवत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या