22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयदारु मिळाली नाही सॅनिटायझर पिले, नऊ जणांचा मृत्यू

दारु मिळाली नाही सॅनिटायझर पिले, नऊ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी लॉकडाऊन काळात दारु न मिळाल्याने अनेक लोकांनी सॅनिटायझर प्यायले, त्यामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. २० पेक्षा जास्त लोकांनी सॅनिटायझर प्यायल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली आहे.

ही घटना कुरीचेड परिसरातील आहे, याठिकाणी सॅनिटायझर प्यायल्याने एका दिवसात तिघांचा तर शुक्रवारी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये २५ ते ६५ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. एसपी सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले की, या लोकांना दारुचं व्यसन इतकं लागलं होतं की, दारु न मिळाल्याने हे सर्व बैचेन झाले होते, त्यामुळे त्यांनी सॅनिटायझर पिऊन टाकलं असं ते म्हणाले. या मृतांमध्ये तीन भिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

सॅनिटायझर पिल्याने त्यांच्या पोटात अचानक आग होऊ लागली. एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली असून, पोलीस या प्रकारच्या घटना इतर ठिकाणी घडल्यात का त्याची पाहणी करत आहेत. मृतांचे वय 25 वर्ष ते 65 वर्षा दरम्यान आहे.

पोलीस चौकशीत समोर आलं की, दुकानातून मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची विक्री होऊ लागली, त्यानंतर लोक दारुऐवजी सॅनिटायझर पीत असल्याचं समोर आलं. स्थानिक दुकानांमधून सॅनिटायझर जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. याप्रकारे किती घटना घडल्या आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासोबत फक्त सॅनिटायझर प्यायल्यानेच या लोकांचा मृत्यू झाला आहे की यात आणखी काही केमिकल मिसळण्यात आलं होतं का? याचीही तपासणी केली जाणार आहे.

Read More  इरफान खानचा मुलगा म्हणाला…मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या