29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय वाहन उद्योगाला कोणतीही सवलत नाही

वाहन उद्योगाला कोणतीही सवलत नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पामधून वाहनउद्योगाला निराशाच दिली आहे.इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देणारी योजना तसेच वाहनविक्रीवरील जीएसटी कमी करण्याची वाहनउद्योगातून मागणी होत होती, मात्र तिला वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत.उलटपक्षी वाहनांमधील काही सुट्टया भागांवर १५ टक्के कस्टम ड्युटी लावली आहे.

स्क्रॅपविषयक धोरणाचे सुतोवाच
वाहनउद्योगाला सरळमार्गाने काही सवलती दिलेल्या नसल्या तरी जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमधून अनेक फायदे वाहनउद्योगाला होतील, अशी योजना सरकारची आहे. जुन्या वाहनांच्या वापर बंद करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्क्रॅपविषयक धोरणाचे सुतोवाच केले.धोरणांतर्गत २० वर्षांपुढील खासगी वाहने व १५ वर्षांपुढील कंपन्यांकडील वाहने वापरण्यास बंदी आणण्याची शक्यता आहे. जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमुळे पर्यावरण अनुकूल वाहनांना प्रोत्साहन मिळेल तसेच वाहनप्रदुषण व तेलआयातीसाठी लागणा-या पैशांचीही बचत होईल.

तसेच वाहनउद्योगाला परदेशातून वाहननिर्मितीसाठी आयात करावे लागणारे पोलाद व अन्य गरजांची पुर्तता होईल असा सरकारचा होरा आहे. स्क्रॅपमधून स्वस्तात मिळणा-या कच्च्या मालामुळे वाहननिर्मितीचा खर्च कमी होऊन वाहनउद्योगला फायदा होईल, परिणामी वाहन उत्पादकांना वाहनांच्या किंमती कमी करुन अधिक वाहनविक्री करता येईल असा सरकारचा अंदाज आहे. याशिवाय वाहनउद्योगाला कोणताही दिलासा दिलेला नाही.

पेट्रोल, डिझेलवर अधिभार, महागाईचा उडणार भडका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या