नवी दिल्ली : भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होणा-या हल्ल्यांबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालाचा भारताने निषेध व्यक्त केला आहे. भारताकडून बाजू मांडताना, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही व्होट बँकेचे राजकारण हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावर संसदेत सादर केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात आरोप केला आहे की २०२१ मध्ये, भारतातील अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर वर्षभर हल्ले झाले, ज्यात हत्या आणि धमकावले गेल्याचा समावेश आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या फॉगी बॉटम मुख्यालयात परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी जारी केला, हा अहवाल जगभरातील धार्मिक स्वातंत्र्य आणि उल्लंघनाच्या स्थितीबद्दल आणि त्यामध्ये होणा-या उल्लंघनाबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक देशासाठी स्वतंत्र प्रकरणे देण्यात आलेली आहेत. भारताने या रिपोर्टचा निषेध केला आहे, भारत सरकारने कोणत्याही परदेशी सरकारला आपल्या नागरिकांच्या घटनात्मकरित्या संरक्षित अधिकारांबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
काय होता अमेरिकेचा दावा?
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमध्ये अल्पसंंख्यांकांना लक्ष्य करून मारल्या जात असल्याच्या घटना वाढत आहेत असा दावाही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याने केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी जागतिक धार्मिक स्वातंत्र्यता अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात भारतातील अल्पसंख्यांक लोकांवर आणि मंदिरांवर हल्ले केले जात असल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.