22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयआता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात मोठा निर्णय घेतला असून, आता वाहन चालक परवाना काढण्यासाठी अथवा नूतणीकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक व परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओत जाण्याची आवश्यकता नसणार आहे़ हे काम ऑनलाईनरित्या होत असल्याने आरटीओ कार्यालयातील दलालांपासून सर्वसामान्यांची मुक्तता होणार आहे़

कोरोना संकटामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परंतु या दरम्यान ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) संबंधित काही कामे करायची असतील, तर आपणास कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण नव्या शासन नियमानुसार, आता वाहनचालकांना आरटीओत जाण्याची गरज भासणार नाही. सर्व आवश्यक प्रक्रिया ऑनलाईन केल्या जाणार आहेत. या अंतर्गत आपण नोंदणी प्रमाणपत्र ६० दिवस अगोदर नूतनीकरण करू शकता.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणे आणि नूतनीकरण करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली. त्याअंतर्गत कोरोना काळात अशा कामांसाठी लोकांना आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. बहुतेक काम डिजिटल पद्धतीने केले जातील.

आरटीओमध्ये परीक्षा देण्यासाठी जाण्याची गरज नाही
आपणास लर्निंग लायसन्स मिळवायचे असेल तर आपणास परीक्षेच्या प्रक्रियेतून जावे लागते. परंतु कोरोना काळात परिवहन मंत्रालयाने यातून दिलासा दिला असून, आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची अत्यावश्यकता दूर केली आहे. आता अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ट्युटोरियलद्वारे घरी बसूनच त्यांना यासाठी मदत मिळू शकेल.

कालबाह्य कागदपत्रे ३० जूनपर्यंत वैध
ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट इत्यादी सारखी मोटार वाहन कागदपत्रे ज्या वाहनचालकांची १ फेब्रुवारी २०२० रोजी कालबा झाली, त्यांना नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिलासा मिळाला आहे. सरकारने त्यांची वैधता मर्यादा ३० जून २०२१ पर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत कालबा कागदपत्रे जूनपर्यंत वैध मानली जातील. वाहन चालकांना कोणतेही चालान भरावे लागणार नाहीत.

के.पी. शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या