24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयरेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू नाही!

रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू नाही!

- रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृृत्तसंस्था
लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चिघळला असून, रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ जेवण आणि पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नसल्याचा दावा दि़ २ जून रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयानंही स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नात लक्ष घातले असून, दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेसंदर्भात करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांना उत्तर दिली आहेत. यात एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला. २१ दिवसांच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे देशभरात विविध राज्यात काम करत असणाºया मजुरांनी घराकडे स्थलांतर करण्यास सुरूवात केली. पायीच घरी जाणाºया अनेक मजुरांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. या गाड्यांमध्ये ८० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. रेल्वेसंदर्भात होत असलेल्या आरोपांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिली आहेत.

Read More  कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्याचे आव्हान

पीयूष गोयल यांनी एक ट्विट करून भाष्य केले आहे. देशात कोणत्याही रेल्वेगाडीला पोहोचण्यासाठी ७ वा ९ दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यान झालेला नाही. रेल्वे प्रवाशांना १.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचे प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत १.७५ टक्के इतकंच आहे, असा दावा गोयल यांनी केला आहे.

केंद्र सरकारने मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सध्या चर्चेत आहेत. या गाड्यांमध्ये मजुरांना खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. दहा दिवसांमध्ये या रेल्वेगाड्यांमध्ये ८० मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या