27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयदहशतवादाचं राजकारण नको : मोदी

दहशतवादाचं राजकारण नको : मोदी

एकमत ऑनलाईन

शांघाय : चीनने आयोजित केलेल्या १४ व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. कोरोनामुळे सलग तिस-या वर्षी ब्रिक्सचे आयोजन साध्या पध्दतीने करण्यात आले होते. परिषदेत पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर मत मांडले.

पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स वर्च्युअल समिटमध्ये म्हटले की, सदस्य राष्ट्रांनी एकमेकांच्या सुरक्षेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. दहशतवादाच्या मुद्यांवर परस्पर सहकार्य केले पाहिजे. या संवेदनशील मुद्द्याचं ‘राजकारण’ करू नये, अस्े त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी आफ्रिका, मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि पॅसिफिक ते कॅरिबियनपर्यंत भारताच्या विकास भागीदारीवर प्रकाश टाकला. जे जागतिक लोकसंख्येच्या ४१ टक्के, जागतिक जीडीपीच्या २४ टक्के आणि जागतिक व्यापाराचे १६ टक्के प्रतिनिधित्व करतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या