21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयशाळा सुरू करण्यास हरकत नाही

शाळा सुरू करण्यास हरकत नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळा उघडल्या जाऊ शकतात. कारण मोठ्या माणसांच्या तुलनेत छोट्या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे. यूरोपातील अनेक देशात कोरोनाच्या वाढत्या काळातही प्राथमिक शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातही प्राथमिक शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील असे संकेत आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी मंगळवार दि़ २० जुलै रोजी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत दिले़

देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असली तरी वैज्ञानिकांकडून वारंवार कोरोनाच्या तिस-या लाटेचे संकेत दिले जात आहेत. तिस-या लाटेचा धोका असताना अनेक राज्यांनी पुन्हा शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठे विधान केले आहे. मोठ्या माणसांच्या तुलनेत छोटी मुले सहजरित्या व्हायरसचा सामना करत आहेत. छोट्या मुलांच्या लंग्समध्ये एसीई रिसेप्टर्स कमी असते ज्याठिकाणी व्हायरस हल्ला करते. कारण मुलांमध्ये एसीई रिसेप्टर्स कमी असते़ त्यामुळे लहान मुलांमध्ये संक्रमणाचा धोका कमी प्रमाणात आढळतो. परंतु त्याचसोबत ६ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये ५७.२ टक्के अँन्टिबॉडी आढळल्या आहेत. जे मोठ्या माणसांप्रमाणे आहेत असे भार्गव म्हणाले.

कोरोना नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू कराव्यात : एम्स
ज्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या केसेस कमी आहेत, त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याबाबत मी सांगत आहे. ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या ठिकाणी अशी योजना आखली जाऊ शकते. परंतु संसर्ग पुन्हा वाढताना दिसल्यास त्या पुन्हा बंद केल्या जाऊ शकतात. परंतु जिल्ह्यांनी एका दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर विचार केला पाहिजे आणि शाळा सुरू करण्याच्या योजना आखल्या पाहिजे असेही गुलेरिया म्हणाले.

मुलांमध्ये चांगली इम्युनिटी
मुलांच्या एकूण विकासात शालेय शिक्षणाचा अतिशय महत्त्व आहे. ऑनलाईन वर्गांपेक्षा मुलांना शाळेतील वर्गांमध्ये जाणे आवश्यक आहे. भारतात अतिशय कमी प्रमाणात मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना ती झाली आहे ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे लवकर बरे होण्यास सक्षम आहेत. सीरो सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला की मुलांमंध्ये वयस्क लोकांपेक्षा अधिक प्रमाणात अँटिबॉडिज आहेत. यामुळे शाळा उघडल्या गेल्या पाहिजे. जितके शाळेत शिक्षण सोपे असते तितके ते ऑनलाईनमध्ये नाही, असेही गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.

बकरी ईद; केरळ सरकारला ‘सर्वोच्च’ झटका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या