23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयहॉटेल, रेस्टॉरंटच्या बिलातील सर्व्हिस चार्जला मनाई!

हॉटेल, रेस्टॉरंटच्या बिलातील सर्व्हिस चार्जला मनाई!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्जबाबत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेलकिंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकारले जात होते, आता त्यामध्ये दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोणत्याही कारणाने हॉटेल किंवा रेस्टॉरंट सेवा शुल्क आकारू शकणार नाहीत. जेवणाच्या बिलातही ते जोडले जाऊ नयेत, असे निर्देश प्राधिकरणाने जारी केले आहेत. कोणत्याही हॉटेलने ते खाद्यपदार्थांच्या बिलात जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर बिलामध्ये सेवा शुल्क देण्याबाबत निर्बंध लादले आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ग्राहकांना आजपासून सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाहीत. हा ऐच्छिक पर्याय आहे. ते घेणे आवश््यक नाही असे या निर्देशांमध्ये सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या