22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसमोस्यांसोबत चमचा नाही; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

समोस्यांसोबत चमचा नाही; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एकमत ऑनलाईन

भोपाळ : सहसा ग्राहकांची फसवणूक झाली तर ग्राहक थेट ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करतात. पण एका ग्राहकाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. या ग्राहकाने दुकानदार समोस्यांसोबत वाटी चमचा देत नाही म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावून तक्रार दाखल केली.

मध्य प्रदेशच्या छतसपूर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. समोस्यांसोबत वाटी-चमचा न मिळाल्याने हा व्यक्ती संतापला आणि चक्क दुकानदारांशी वाद घालायला लागला. वाद इतका विकोपाला गेला की त्यानंतर त्याने थेट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन लावला आणि तक्रार दाखल केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या