22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeराष्ट्रीयपुढील वर्षी सुरुवातीपासूनच नोक-यांचा सुकाळ

पुढील वर्षी सुरुवातीपासूनच नोक-यांचा सुकाळ

सर्वेक्षणातील निष्कर्ष : कंपन्यांकडून पहिल्या तिमाहीतच मोठी भर्ती होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वर्ष २०२० मध्ये कोरोनासंकटामुळे लाखोंच्या संख्येने लोकांना नोक-या गमवाव्या लागल्या. मात्र पुढील वर्षी २०२१ मध्ये पहिल्यापासूनच नोक-यांचा सुकाळ असणार आहे. पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्च या काळातच अनेक मोठ्या कंपन्यांकडून मोठी नोकरभरती होण्याचे संकेत आहेत. दिल्लीतील मॅनपॉवर ग्रुपच्यावतीने आगामी वर्षातील रोजगाराच्या संधींबाबत देशातील १५१८ कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात कंपन्यांनी २०२१च्या पहिल्या तिमाहीतच मोठ्या प्रमाणात नोकरभरती करावी लागणार असल्याचे सांगितल्याचे समजते.

मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे समूह संचालक संदीप गुलाटी यांनी सांगितले की, भारतातील कॉर्पोरेट उद्योगक्षेत्रात मोठ्या सुधारणेचे संकेत दिसत आहेत. बाजारातील एकुण कल सकारात्मक दिसून येत आहे. सरकारच्या घोषणांंचे परिणामांपेक्षाही उद्योगाच्या स्वत:च्याच उलाढालीतून रोजगारवाढीमध्ये सकारात्मकता दिसून येणे ही खूप चांगली बाब आहे. उद्योगातील स्पर्धा व काही प्रमाणात आत्मनिर्भर भारत योजनेचाही लाभ रोजगारवाढीला कारणीभूत आहे.

५ टक्क्यांनी रोजगारवाढीची शक्यता
पहिल्या तिमाहीतच रोजगारवाढीच्या दरात ५ टक्क्यांनी वाढीचा अंदाज आहे. ही वाढ २०२० च्या शेवटची तिमाही (ऑक्टोबर ते डिसेंबर) पेक्षा दोन टक्क्यांनी जास्त असणार आहे. पहिल्या तिमाहीत अर्थिक सेवा, विमा, रिअल इस्टेट, खाण व उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या दरात चांगली कामगिरी होणार आहे. इतर सर्व क्षेत्रातील नकारात्मक वातावरण कायम राहणार आहे, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

सणासुदीचा अर्थव्यवस्थेला लाभ
दिवाळीसह इतर सणांमुळे अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच आशादायी चित्र असले तरी पुढील सहा – नऊ महिन्यांत रोजगारनिर्मितीत अधिक गतीने वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात सहभागी ६५ टक्के कंपन्यांनी डिसेंबर २०२० च्या तिमाहीपेक्षा २०२१ च्या पहिल्या ९ महिन्यातच कोविडपुर्व स्थितीएवढ्याच प्रमाणात पुन्हा कर्मचा-यांची भरती करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.

‘इएसआयसी’ग्राहकांना दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या