28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयराजपथ नव्हे, आता कर्तव्यपथ

राजपथ नव्हे, आता कर्तव्यपथ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजपथचे नवे नाव आता ‘कर्तव्यपथ’ असे असणार आहे. बुधवारी झालेल्या एनडीएमसीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

एकेकाळी किंग्सवे म्हणून ओळखल्या जाणा-या राजपथाला आता कर्तव्यपथ म्हटले जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधलेल्या विभागाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथचे नाव बदलण्यासाठी, नवी दिल्ली नगर परिषदेने आज ७ सप्टेंबरला राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून कर्तव्य पथ करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

ऐतिहासिक मार्गाचे नाव बदलले
भारतीय जनता पार्टीच्या नामांतर सोहळ्याच्या लक्ष्यस्थानी आता राजपथ आला आहे. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत जाणा-या या ऐतिहासिक मार्गाचे नाव आता ‘कर्तव्यपथ’ अर्थात कर्तव्याचा मार्ग असे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्याला आज एनडीएमसीच्या बैठकीत मंजुरीही मिळाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या