21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयकोणत्याही राजकीय घडामोडीत सक्रिय नाही

कोणत्याही राजकीय घडामोडीत सक्रिय नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सन २०२२ मध्ये होणा-या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेली सात वर्षे देशातील सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यादरम्यान, राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र प्रशांत किशोर यांनी आता राजकारणातील प्रवेशाबाबत मोठे विधान करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

प्रशांत किशोर यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत मी कुठल्याही राजकीय घडामोडींचा भाग नाही आहे. तसेच २०२२ मध्ये होणा-या पाच राज्यांमधील निवडणुकीतही माझी कुठलीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका नसेल, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत काँग्रेसनेही कुठलेही विधान केलेले नाही. तसेच ही बाब फेटाळूनही लावलेली नाही.

बंगाल निवडणुकीनंतर सक्रिय सहभाग नाही
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, सध्याचा पंजाबमधील विषय असो वा कुठली अन्य विषय असो. काँग्रेसच्या कुठल्याही निर्णयामध्ये माझा कुठलाही सहभाग नव्हता. तसेच बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा जो निर्णय घेतला होता. त्यावर मी अजूनही कायम आहे. राजकारणातील प्रवेशाबाबत मी काही निर्णय घेतला तर त्याबाबत मी सार्वजनिक मंचावरून घोषणा करेन. मात्र सक्रिय राजकारणामध्ये काम सुरू ठेवायचे की नाही, याबाबत मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.

राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या