26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसगळेच कैदी स्वभावाने गुन्हेगार नसतात

सगळेच कैदी स्वभावाने गुन्हेगार नसतात

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज एक दिवसीय गुजरात दौ-यावर आहेत. वेळापत्रकानुसार, अमित शहांनी अहमदाबादमध्ये सर्वप्रथम स्मार्ट शाळांचे उद्घाटन केले. यानंतर ते अखिल भारतीय जेल ड्युटी मीटमध्ये सहभागी झाले.
यावेळी बोलताना गृहमंत्री शहा म्हणाले, समाजाचा तुरुंगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. तुरुंगातील प्रत्येक व्यक्ती स्वभावाने गुन्हेगार नसतो. कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग पाडते, असे त्यांनी स्पष्ट केले. समाज नीटनेटका ठेवण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा होणेही गरजेचे असल्याचे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

शिक्षा झाली नाही तर भीती राहणार नाही
शिक्षा झाली नाही तर भीती राहणार नाही. जेव्हा भीती नसते, तेव्हा शिस्तही पाळता येत नाही. जे जन्मत: गुन्हेगार नाहीत, त्यांना बहाल करण्यासाठी तुरुंग प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी अमित शहांनी अहमदाबादमध्ये ४ स्मार्ट शाळांचे उद्घाटन केले. उद्घाटन समारंभात आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांनी सांगितले की, अहमदाबाद शहरात २२ अद्वितीय स्मार्ट शाळा तयार होत आहेत आणि यापैकी चार शाळा आज सुरू झाल्या आहेत. या शाळांच्या माध्यमातून ३२०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचेही शहा म्हणाले. एक दिवसीय दौ-यात गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद, गुजरातमध्ये तीन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या