22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयधर्मांतरण प्रकरणी अ‍ॅमेझॉन इंडियाला नोटीस

धर्मांतरण प्रकरणी अ‍ॅमेझॉन इंडियाला नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने शुक्रवारी अ‍ॅमेझॉन इंडियाला नोटीस बजावून बेकायदेशीर कामामध्ये गुंतलेल्या एनजीओला कथितपणे निधी पुरवल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणी अ‍ॅमेझॉन इंडियाकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एनसीपीसीआरने नोटीस जारी करून म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशमधील सामाजिक न्याय मंच या एनजीओकडून आयोगाला तक्रार प्राप्त झाली आहे. यूएस आणि यूकेमध्ये नोंदणीकृत ऑल इंडिया मिशन बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे, जे भारतात बेकायदेशीरपणे मुलांचे धर्मांतर करत आहेत.

वरील संस्थेचे संपूर्ण भारतात १०० पेक्षा जास्त अनाथाश्रम असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, संस्थेच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया पेजेसवर स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांनी भारतात धर्मांतर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि विशेषत: ईशान्य, झारखंडमध्ये अनेक लोकांचे धर्मांतर केले आहे. या संस्थेला अ‍ॅमेझॉन इंडियाकडून निधी मिळतो, असा आरोपही या तक्रारीत करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की अ‍ॅमेझॉन इंडियाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नमूद केले आहे की, त्यांचे ग्राहक अ‍ॅमेझॉन स्माईलवर खरेदी करून ऑल इंडिया मिशनला समर्थन देऊ शकतात.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या