नवी दिल्ली : पाटणा उच्च न्यायालयाने न्यायाधीशावर केलेल्या निलंबन कारवाईस आव्हान देणा-या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्यता दिली.
संबंधित न्यायाधीशाने लैंगिक गुन्ह्यांंपासून बालकांच्या संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) प्रकरणासह एकाच दिवसात अनेक खटल्यांवर निकाल दिले. बिहार राज्य सरकारला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.