19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयमराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा; ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा; ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा

एकमत ऑनलाईन

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, राज्य सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यास कमी पडले, असा आरोप मराठा समाजाने केला असून सरकारचा निषेध करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, १७ सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात येत आहेत.

सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडले आहे का का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मराठा समाज आता राज्यात आक्रमक होत असून अनेक ठिकाणी निदर्शने व आंदोलने केली जात आहे, तर कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मराठा संघटना यात सामील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात आक्रमक भुमिका घेतली आहे. पुण्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. आमचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात कार्यकर्ते एकत्र येऊन १७ सप्टेंबर रोजी निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात येत होते. ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील या नोटीशीतून बजावण्यात आले होते.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा; ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या