22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयकोवोवैक्स पहिल्या खेपेची निर्मिती सुरु

कोवोवैक्स पहिल्या खेपेची निर्मिती सुरु

एकमत ऑनलाईन

पुणे : अमेरिकेतील नोवावॅक्स कंपनीची लस कोरोना विरोधात प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते़ ही लस तिन्हीही क्लिनीकल ट्रायलमध्ये ९० टक्के यशस्वी झाली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवरदेखील नोवावॅक्स लस प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. जगभरात कोरोना लसीची मागणी मोठया प्रमाणात आहे. कोवोवॅक्स या लसीची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट आॅफ इंडिया करत आहे. या लसीच्या पहिल्या खेपेची निर्मिती भारतात सुरु झाली असल्याची माहिती सीरम इन्स्टिटयूटने दिली आहे.

याबाबत माहिती देताना सीरमने म्हटले आहे की, एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. या आठवडयात आम्ही नोवावॅक्सच्या पहिल्या खेपेची निर्मिती पुण्यात करण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक विकासशील देशात लसीकरणासाठी नोवावॅक्स महत्वाची भूमिका बजावू शकते, असे अमेरिकेतील तज्ज्ञांनी सांगितले आहे. भारतात लसीकरण निर्मिती करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट आॅफ इंडिया कोवोवॅक्स या लसीचीही निर्मिती करत आहे. भारतात निर्मिती केल्या जात असलेल्या या लसीला कोवोवॅक्स असे म्हटले जात आहे़

महिन्याला १० कोटी डोस तयार करणार
सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अमेरिका, यूरोप आणि अन्य ठिकाणी लसी वापरण्याची मंजूरी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. महिन्याला १० कोटी लसी डोस तयार करण्याची सध्या आमची क्षमता आहे. नोवावॅक्सचे मुख्य कार्यअध्यक्ष स्टेनली एर्क यांनी सांगितले की, या दोन शॉटच्या लसीला २ ते ८ डीग्री सेल्सियलच्या दरम्यान ठेवण्याची गरज असते. यामुळे लसीला स्टोअर करणे तसेच त्याची वाहतूक करणे सोपे होणार आहे. खासकरुन विकसनशील देशांमध्ये लसीचा पुरवठा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याची आशा आहे. सुरुवातीला आम्ही लसीचे डोस गरीब आणि अति गरीब देशांमध्ये पाठवणार आहोत.

वटसावित्री पौर्णिमे निमित्त जिल्ह्यात बचतगट महिलांकडून १ हजार वडाच्या झाडाचे वृक्षारोपण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या