26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयआता भाजपची राजस्थानवर स्वारी!

आता भाजपची राजस्थानवर स्वारी!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ताबदल केल्यावर भाजप नेतृत्वाने आता त्याच पध्दतीने राजस्थानातही सत्ताबदलाची शक्यता चाचपण्यास सुरवात केली आहे. राजस्थानात सचिन पायलट यांना भाजपकडे वळविण्याचा यापूर्वीचा प्रयोग फसला तरी पक्षनेतृत्वाने आशा सोडलेली नाही.

सत्तांतराच्या डावात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी वठविलेल्या भूमिकेत दिसून येत आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने समजूत काढण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू केले आहेत. वसुंधरा राजे यांच्या कारभाराबद्दल जनतेत अजूनही रोष आहे. मात्र त्यांची उपद्रवक्षमताही मोठी असल्याने ‘दिल्लीश्वरांनी’ वसुंधरा यांच्याबाबत सावध पावले टाकण्याचा पवित्रा घेतला आहे.

राजस्थानात पुढील वर्षी (२०२३) विधानसभा निवडणुका आहेत मात्र भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला तेवढे थांबण्याचीही गरज वाटत नाही. मुख्य म्हणजे उदयपूर येथील २८ जूनच्या कन्हैयालालच्या हत्याकांडाने भाजपच्या आशा पल्लवित केल्या आहेत. संघपरिवाराच्या दृष्टीने ही घटना भाजपला पुन्हा सत्तेपर्यंत नेण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आजच राजस्थान दौरा करणे, हा योगायोग मानला जातो.

सध्याचे गेहलोत सरकार ‘जुगाड’ पध्दतीने कसेबसे तगले आहे व ते आपोआप लवकरच सत्तेबाहेर जाईल, आम्हाला काही करण्याची गरजच उरणार नाही असे भाजप नेते सातत्याने व छातीठोकपणे सांगत आहेत. तथापि, राजस्थानात कॉँग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून येत असल्याने राज्य मुदतपूर्व निवडणुकांच्या दिशेने जात असल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष अरूण चतुर्वेदी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या