26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयआता भाजप पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवत आहे : आप

आता भाजप पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवत आहे : आप

एकमत ऑनलाईन

चंदिगढ : भाजप दिल्ली सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केला होता. हाच आरोप आता पंजाबमधील आप सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी देखील केला आहे. पंजाबमध्ये भाजपने ऑपरेशन लोटस चालवले असून भाजप आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे हरपाल सिंग चीमा म्हणाले आहेत. अर्थमंत्री चीमा म्हणाले की, भाजप प्रत्येक आप आमदाराला प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर देत आहे.

याबाबत आप पंजाबने ट्वीट केले आहे की सिरियल किलर भाजपने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील आपच्या आमदारांना २५-२५ कोटींची ऑफर दिली आहे. पण भाजप हे विसरत आहे की, आम आदमी पक्षाचा एकही आमदार विकला जाणार नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपची ऑपरेशन अपयशी ठरेल.

हरपाल सिंग चीमा यांनी मंगळवारी चंदीगड येथे भाजपवर आरोप केला की आपचे आमदार विकत घेऊन पंजाबमधील आप सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ऑपरेशन लोटससाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणा, तसेच पैशाचा वापर करत आहे. चीमा म्हणाले की, भाजपने आमच्या आमदारांना पक्षापासून वेगळे होण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. एवढेच नाही तर भाजपने या आमदारांना मोठ्या पदाचे आमिषही दिले आहे. यासोबतच तुम्हाला आणखी आमदार मिळाल्यास ७५ कोटी रुपये दिले जातील, असे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या