नवी दिल्ली : आता कोरोना झाला किंवा नाही हे केवळ एका फुंकर वरून एका मिनिटाच्या आत समजणार असल्याचे दिलासाजनक वृत्त असून, भारत आणि इस्त्रायल या अतिशय महत्वकांक्षी संशोधनाच्या शेवटच्या टप्प्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि इस्रायल संयुक्तपणे कोरोना विषाणूची चुकटीसरशी चाचणी करण्याचे एक गेमचेंजर तंत्रज्ञान तयार करत असून, ते आता शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या काही दिवसातच हे किट तयार होणार आहे. या द्वारे एका मिनिटाहूनही कमी वेळेत कोरोनाचा रिपोर्ट मिळणार आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यानी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. येणाºया काळात भारत आणि इस्रायल या दोन देशांमध्ये चांगल्या संबंधांसाठी आरोग्यसेवा हे महत्त्वाचे क्षेत्र असणार आहे.
भारत आणि इस्रायल हे दोन देश तयार करत असलेल्या या रॅपिड टेस्ट टेक्नॉलॉजी एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे फक्त एका मिनिटाच्या आत सांगणार आहे. ही संपूर्ण जगासाठी एक गुड न्यूज आहे, असेही माल्का म्हणाले.
अत्यंत महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर भारत आणि इस्त्रायल मिळून तयार करीत असलेली ही टेक्नॉलॉजी एअरपोर्ट आणि इतर अत्यंत महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
किटच्या निर्मितीसाठी अतिशय कमी खर्च
किटच्या निर्मितीसाठी पैसा देखील अतिशय कमी लागणार आहे. कारण या चाचणीच्या रिपोर्टसाठी नमुना लॅबमध्ये पाठवण्याची आवश्यकता नसते. तेथल्या तेथेच रिपोर्ट प्राप्त होणे हेच या किटचे वैशिष्ट्य आहे.
ध्वनीद्वारे कोरोना चाचणीची देखील चाचणी
भारत आणि इस्रायलने संयुक्तपणे ४ चाचणी तंत्रज्ञानाची चाचणी घेतलेली आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर या चाचणीसाठी नमुने गोळा करण्यात आले. या तंत्रामध्ये ब्रेथ अॅनलायझर आणि ध्वनीची चाचणीचा देखील समावेश आहे. यामध्ये कोरोना झाला आहे की नाही हे तात्काळ समजणार आहे.
सेकंदात सुपर रॅपीड चाचणी
ज्या व्यक्तीची चाचणी करायचे आहे त्या व्यक्तीने एका नळीत फक्त तोंडाने हवा फुंकायची आहे. यामुळे ३० सेकंद, ४० सेकंद आणि ५० सेकंदात चाचणीचा रिपोर्ट प्राप्त होणार आहे, असे रॉन माल्का यांनी सांगितले.
वित्तीय धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये