18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयआता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स

आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सगळ्याच मॉडेलच्या कारमध्ये एअर बॅग लावण्याचे वक्तव्य पुन्हा एकदा केले आहे. रविवारी त्यांनी एका इंटरव् ू दरम्यान म्हटले आहे की, छोट्या कार या अधिकतर निम्न मध्यम वर्गाच्या लोकांकडून खरेदी केल्या जातात. त्या कारमध्ये योग्य त्या आवश्यक संख्येमध्ये एअरबॅग्स असायला हवेत. मी हैराण आहे यासाठी की ऑटोमोबाईल कंपन्या या केवळ श्रीमंत लोकांकडून खरेदी केल्या जाणा-या मोठमोठ्या आणि महाग कारमध्येच ८ एअरबॅग्स देतात. मी कार कंपन्यांना सगळ्या प्रकारच्या मॉडेलवर कमीतकमी ६ एअरबॅग्स देण्याची अपील करतो.

नितीन गडकरी यांनी या आवाहनानंतर पुन्हा एकदा मोठी चर्चा छेडली गेली आहे. आता मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी सारख्या कारप्रमाणेच अल्टो, सॅण्ट्रो, क्विडसारख्या कारमध्ये देखील ६ अथवा त्याहून अधिक एअरबॅग्स असतील का? जर तसे झाले तर सामान्य ग्राहकावर त्याचा किती अधिक भार पडेल? की कंपन्या कसलीही रक्कम न वाढवता या सुविधा प्राप्त करवून देतील? हे सारे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. मात्र, या अतिरिक्त सुविधेचा भार ग्राहकांवरच पडण्याची शक्यता अधिक आहे.

गाड्यांची किंमत वाढणार
इंडस्ट्रीमधील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ एअरबॅग्स या अनिवार्य असतील. वेगवेगळ्या मॉडेल्सच्या आधारावर प्रति बॅग्स ४०००-१२००० रुपये अधिक लागण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की, कारच्या किंमतींमध्ये १६००० रुपये ते ४८००० रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते.

सद्यपरिस्थितीत २ एअरबॅग्स अनिवार्य
वास्तविकत: नव्या नियमांनुसार, एप्रिल २०२१ पासून सर्व नव्या कार मॉडेल्समध्ये पुढे दोन्ही सीट्ससाठी एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. तर ३१ ऑगस्ट २०२१ पासून कार मॉडेल्सच्या पुढच्या दोन्ही सीट्ससाठी एअरबॅग्स अनिवार्य आहेत. त्यामुळे कार कंपन्यांना ६ एअरबॅग्ससाठी ४ एअरबॅग्स अतिरिक्त लावाव्या लागणार आहेत.

कंपन्यांना आवाहन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व वाहन निर्मीती कंपन्यांना आवाहन केले असून, त्यांनी आता सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये सर्व सिटला एअरबॅग्स उपलब्ध करून द्यावा, यामुळे वाहनातील सर्वांना एकप्रकारे विश्वसनीय सुरक्षा प्रदान होईल आणि अपघातातील जिवीतहानी टाळता येणार असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या