24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआता म्हशींचेही बनणार आधार कार्ड

आता म्हशींचेही बनणार आधार कार्ड

एकमत ऑनलाईन

नोएडा : तुम्हाला आधार कार्डची माहिती असलीच पाहिजे. यातून बरेच काम सोपे झाले आहे. त्यामुळे लोकांची ओळख तर सोपी झाली आहेच, पण फसवणुकीचे अनेक प्रकारही थांबले आहेत. त्याच्या यशाने प्रोत्साहित होऊन सरकार प्राण्यांचे आधार कार्डही बनविणार आहे. त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घोषणा केली आहे.

आगामी काळात माणसांप्रमाणे चक्क म्हशींचे देखील आधार कार्ड काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली असून याबाबतची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पशु आधार असे या मोहिमेचे नाव आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास यामुळे मदत होईल, असे मोदींचे म्हणणे आहे.

डेअरी क्षेत्राला विज्ञानाची जोड
आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे नुकतेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. देशातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे.

दुग्धजन्य प्राण्यांचा मोठा डेटाबेस तयार
देशात दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार केला जात असून डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जाणार असल्याचेही मोदी म्हणाले. आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते. याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे असे मोदींनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या