22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयआता एनआरआयसुद्धा आधारसाठी अर्ज करू शकतात?

आता एनआरआयसुद्धा आधारसाठी अर्ज करू शकतात?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आधारकार्ड हे डॉक्युमेंट भारताचा निवासी असण्याच सर्वात मोठे आणि मूलभूत डॉक्युमेंट आहे. पण एनआयआर सुद्धा यासाठी अर्ज करू शकतो का? याबाबत बराच संभ्रम आहे; यूआयडीएआय म्हणते की एनआरआयदेखील आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात.

भारतात पॅन कार्डपासून ते बँक खात्यांपर्यंत, प्रत्येक गोष्ट तुमच्या आधारशी लिंक आहे, ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट बनला आहे. सरकार पुरस्कृत अनेक योजनांनी त्यांच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. म्हणूनच हे डॉक्युमेंट अनिवासी भारतीयांसाठीदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. पण, अनिवासी भारतीयांना ते आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात की नाही याबद्दल अनेकदा अस्पष्टता असते. यूआयडीएआयने आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केले आहे की वैध भारतीय पासपोर्ट असलेला अनिवासी भारतीय आधार कार्डसाठी अर्ज करू शकतो.

याची चाचपडताळणी कोणीही यूआयडीएआय आधारच्या ऋअद विभागाला भेट देऊन करू शकतो. आधार कार्ड नोंदणीबाबत एनआरआय लोकांनी विचारल्या जाणा-या अनेक प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एनआरआयसाठी उर्वरित भारतीय नागरिकांसारखीच आहे.

एनआरआय आधार कार्डसाठी अर्ज कसा करू शकतो?
यूआयडीएआयने एनआरआयद्वारे आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रियेचा देखील उल्लेख केला आहे.

१: तुमच्या जवळच्या कोणत्याही आधार सेवा केंद्रात जा.
२ : तुमचा वैध भारतीय पासपोर्ट तुमच्यासोबत घेऊन जा
३ : नावनोंदणी फॉर्म घ्या आणि सर्व आवश्यक तपशीलांसह भरा. तुम्ही नावनोंदणी फॉर्ममध्ये भरलेले तपशील तुमच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या तपशीलांशी जुळत असल्याची खात्री करा.
४ : अर्जदाराने फॉर्ममध्ये त्यांचा ईमेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
५: नंतर ऑपरेटरला तुमची एनआरआय म्हणून नोंदणी करण्यास सांगा

तुमचा आधार कार्ड ३-४ दिवसात तयार होईल. पण कधीकधी डॉक्युमेंट तयार होण्यास आणखी काही वेळ लागू शकतो. अर्जदारांनी त्यांच्या आधार कार्डचे स्टेटस नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.

ज्यांनी चुकून त्यांचा १४ अंकी नाव नोंदणी आयडी हरवला असेल, ते तपशील पुनर्प्राप्त करण्यासाठी त्यांचा नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरू शकतात. तुमच्या १४ अंकी नावनोंदणी आयडीची माहिती पुनर्प्राप्त करण्याचा पर्याय देखील वेबसाइटवर देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या