30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय आता ग्रॅच्युइटी पाच वर्षाऐवजी एका वर्षात मिळू शकते

आता ग्रॅच्युइटी पाच वर्षाऐवजी एका वर्षात मिळू शकते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली –संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कामगार सुधारणांशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मांडली. यामध्ये ऑक्‍यूपेशनल सेफ्टी, हेल्‍थ एंड वर्किंग कंडीशन कोड 2020 इंडस्‍ट्रीयल रिलेशंस कोड 2020 आणि सोशल सिक्‍योरिटी कोड 2020यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी कोडमध्ये बर्‍याच नवीन तरतुदी जोडल्या गेल्या आहेत. या संदर्भात ग्रॅच्युइटीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, आता ग्रॅच्युइटी पाच वर्षाऐवजी एका वर्षात मिळू शकते.

पाच वर्षे पूर्ण करण्याची गरज नाही

सोशल सिक्युरिटी कोड 2020 च्या नवीन तरतुदींमध्ये असे सांगितले गेले आहे की, ज्या लोकांना फिक्सड टर्म बेसिसवर नोकरी मिळेल. त्या दिवसाच्या आधारे त्यांना ग्रॅच्युइटी घेण्याचा देखील अधिकार असेल. यासाठी पाच वर्षे पूर्ण करण्याची गरज नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, कॉन्ट्रॅक्ट बेसिस काम करणाऱ्यांना त्यांच्या पगारासह ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल. मग कॉन्ट्रॅक्ट कितीही काळ असो. सोशल सिक्‍योरिटी कोड 2020 (Social Security Code 2020) संसदेमध्ये लागू झाल्यानंतर हे दोन्ही सदन पारित करेल. यानंतरच हा कायदा तयार केला जाईल. आणि त्यानंतरच तरच तुम्हाला त्याच्या सर्व नियमांची माहिती मिळेल.

दीर्घकाळ काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटी दिली जाते

पगार, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून एखाद्या कर्मचार्‍यास मिळालेले बक्षीस. जर कर्मचार्‍याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर त्याला गॅरंटीड पद्धतीने विहित फॉर्म्युल्यानुसार ग्रॅच्युइटी दिली जाईल. ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कर्मचार्‍याच्या पगारामधून कट केला जातो, परंतु मोठा भाग कंपनीकडून दिला जातो. सध्याच्या सिस्टम नुसार, एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीत कमीतकमी 5 वर्षे काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटीचा अधिकार असेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या