28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयआता आयआरसीटीसीची मच्छरांसाठी ट्रेन

आता आयआरसीटीसीची मच्छरांसाठी ट्रेन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डास म्हणजे आजार पसरवण्यास कारक ठरतात. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया असे गंभीर आणि जीवघेणे आजार होतात. त्यामुळे डास आपल्या आसपास असावेत असे कुणालाच वाटत नाही. किंबहुना डासांच्या नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. उपाय केले जातात. असे असताना डासांसाठी स्पेशल ट्रेन का बरे? याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.

रेल्वे, ट्रेन म्हटले की त्यात प्रवासी आणि मालवाहतूक होते. सणासुदीचा काळ असेल किंवा काही खास कार्यक्रम असेल तर स्पेशल ट्रेन चालवल्या जातात. पण कधी डासांसाठी स्पेशल ट्रेन चालवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? पण देशाच्या राजधानीत अशीच डासांसाठी खास स्पेशल ट्रेन चालवली जाते आहे. मॉस्क्विटो टर्मिनेटर ट्रेनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

डासांसाठी ट्रेन म्हणजे?
या ट्रेनमधून डासांची वाहतूक होणार नाही तर ही ट्रेन डासांचा खात्मा करणार आहे. पावसाळा म्हटला की डासांमुळे पसरणा-या आजारांचा धोका. घरात आपण डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, कॉईल, क्रिम, लिक्विड याचा वापर करतो. प्रशासनामार्फत जागोजागी फवारणी केली जाते. पण दिल्लीत या डासांचा खात्मा करण्यासाठी ही स्पेशल ट्रेन चालवली जाते.

काय आहे उद्देश?
६ आठवडे एकूण १२ वेळा ही ट्रेन चालवली जाईल. दोनदा या ट्रेनमार्फत कीटकनाशकांची फवारणी केली जाईल. रेल्वे रूळ, त्याच्या आसपास डासांची पैदास होऊ नये, हे याचं उद्दिष्ट आहे. अधिका-यांच्या मते, ब-याच ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर अस्वच्छ पाणी जमा होते आणि तिथे डासांची पैदास होते. यामुळे डासांच्या अळ्याच नव्हे तर डासांचाही नायनाट होईल. रेल्वे रूळांजवळ झोपड्यांमध्ये राहणा-यांसाठी हा दिलासा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या