21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयआता ईशा अंबानी रिलायंस रिटेलची ‘चेअर पर्सन’?

आता ईशा अंबानी रिलायंस रिटेलची ‘चेअर पर्सन’?

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुकेश अंबानी यांनी नुकताच रिलायंस जियोचा कार्यभार आकाश अंबानीला सोपवला असून परत एक मोठी बातमी पुढे आली आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायंस जियोचा सर्व कार्यभार आता मोठ्या मुलावर सोपवल्यानंतर रिटेलचा कार्यभार ईशावर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

रिलायंस रिटेल बोर्डाच्या बैठकीत याबातचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुकेश अंबानी यांचे सगळ्याच व्यवसायाचे उत्तराधिकारी ठरलेले असल्याचा एक संकेत यातून मिळतो. पुढल्या दोन दिवसात रिटेलचा संपूर्ण कार्यभार ईशावर सोपवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेडची संचालक आहे. रिटेलच्या विस्ताराची संपूर्ण जबाबदारीही सध्या ईशावर आहे.

ईशा आणि आकाश हे जुळे बहिण भाऊ आहेत. या भावंडांनी येल युनिवर्सिटीतून उच्चशिक्षण घेतले आहे.२७ जूनला आकाश अंबानीची नियुक्ती जगातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी रिलायंस जियोच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.

रिलायंस जियोच्या बोर्डाच्या बैठकीत आकाशच्या चेअर पर्सन बनण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता रिटेलचा चेअर पर्सन ईशाला घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या