23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयआता राज्यसभेत नो सर म्हणायला बंदी

आता राज्यसभेत नो सर म्हणायला बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मागणीला राज्यसभा सचिवालयाने मान्य केले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या कामकाजादरम्यान कानावर पडणारा नो सर हा शब्द येथून पुढे ऐकू येणार नाही आहे. चतुर्वेदी यांच्या मागणीनंतर राज्यसभा सचिवालयाने या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रियंका यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्राला देण्यात आलेल्या उत्तरात हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात चतुर्वेदी यांनी नो सर सारख्या वाक्यांचा वापर बदलण्याची मागणी केली होती. जो अनेकदा सभागृहात उत्तरावेळी बोलला जात होता. ८ सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात पुरुषप्रधान असलेला हा शब्द बदलावा अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली होती.

छोटे पाऊल, मोठा फरक
राज्यसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, छोटे पाऊल, मोठा फरक. मंत्र्यांपासून महिला खासदारांपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे देताना, संसदेतील पुरुषप्रधान शब्द दूर केल्याबद्दल राज्यसभा सचिवालयाचे आभार त्यांनी मानले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या