23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयआता मिशन अग्निपथ

आता मिशन अग्निपथ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांतील नवीन प्रकारच्या सैन्य भरतीच्या मिशन अग्निपथ योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. या योजनेत भरती झालेल्या तरुणांना अग्नीवीर असे खास नाव दिले जाणार असून अग्नीवीर म्हणून झालेली निवड प्रत्येकी चार वर्षांसाठी असेल, अशीही माहिती राजनाथसिंह यांनी दिली. यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते.

अग्नीपथ योजनेत दर वर्षी साधारणत: ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी चार वर्षांसाठी तरूणांची सैन्यभरती करण्यात येईल. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरूणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाईल व उर्वरीत उमेदवारांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळेल. जगभरातील अनेक देशांचा अभ्यास करून ही योजना तयार केली आहे. येत्या काळात भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल आणि या नवीन योजनेमुळे तरुणांना उत्तम प्रतीचा रोजगार उपलब्ध होईल, असेही ते पुढे म्हणाले.

लष्कराच्या सैनिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. भारतीय सैन्याचे सरासरी वय सध्या ३२ वर्षांचे आहे. मिशन अग्निपथ मुळे ते वय २४ ते २६ वर्षांपर्यंत कमी होईल आणि सैन्यात तंत्रकुशल तरुण सैनिकांचे प्रमाण वाढेल, असे ते म्हणाले. ४ वर्षांची नियुक्ती संपल्यावर यापैकी २५ टक्के अग्नीवीरांना सैन्यदलात कायमस्वरूपी सामावून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या