28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयआता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान

आता फक्त एका चाचणीमधून होणार कॅन्सरचे निदान

एकमत ऑनलाईन

मुंबई : कर्करोग किंवा कॅन्सर हा एक प्राणघातक विकार. ब-याचदा असे होते़ की एखाद्या धडधाकट व्यक्तीला अचानक काही तरी व्हायला लागते आणि नंतर स्पष्ट होते, की त्याला कॅन्सर आहे नि तो शेवटच्या टप्प्यात आहे. कॅन्सर पहिल्या टप्प्यात असताना निदान झाले तर काही तरी औषधोपचार करून रुग्णाचे आयुष्य वाढवता येते. या पार्श्वभूमीवर, काही भारतीय शास्त्रज्ञांनी रक्ताच्या एका साध्या तपासणीतूनच कॅन्सरच्या पहिल्या टप्प्याचा शोध लागेल असे एक तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र १०० टक्के प्रभावी आहे.

या टेस्टचे नाव एचआरसी असे असून, मुंबईची एपिजेनेरस बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि सिंगापूरची जार लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून ही टेस्ट विकसित केली आहे. या तंत्राचे वैशिष्ट्य हे आहे, की यातून २५ वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचे निदान होऊ शकते. काही प्रकारच्या कॅन्सरचे निदान तर टयूमर विकसित होण्याच्या आधीही करणे या तंत्राद्वारे शक्य आहे, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. मुंबईचे नॅनोटेक शास्त्रज्ञ विनयकुमार त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांची या कंपनीत मोठी भागीदारी आहे. जार लॅबचे प्रमुख आशिष त्रिपाठी यांनी असा दावा केला आहे, की कॅन्सरचं पूर्वनिदान करणारी ही जगातली पहिलीच टेस्ट आहे.

भविष्यात संबंधित व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका किती आहे, याचा अंदाज या टेस्टमधून बांधता येऊ शकतो. व्यक्तीला वर्षातून एकदाच एचआरसी टेस्ट करावी लागेल. त्याद्वारे, व्यक्तीला कॅन्सर असल्यास त्याचं पहिल्या टप्प्यातच निदान होऊ शकेल. आशिष यांचे जावई आणि मुंबई पोलिस दलातील दिवंगत वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय यांच्यावरून टेस्टला एचआरसी हे नाव देण्यात आले आहे. कॅन्सरशी झुंज देता देता २०१८ मध्ये त्यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं होतं.

या टेस्टमध्ये स्टेम सेल टेक्निक अर्थात मूळपेशी तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे. स्टेम सेल्स म्हणजे शरीराच्या अशा पेशी, की ज्यांमध्ये स्वत:च्या प्रतिकृती बनवण्याची क्षमता असते आणि त्या दुस-या प्रकारच्या पेशींमध्ये स्वत:ला बदलू शकतात. बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स लाल आणि पांढ-या रक्तपेशींची निर्मितीही करू शकतात. अशा वैशिष्ट्यपूर्ण स्टेम सेल्सचे महत्त्व खूप असते.

भेद विसरून गरजूंना मदत करा, नागपुरात गडकरी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या