21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयआता खेड्यांमध्येही प्ले स्कूल; पंतप्रधानांची घोषणा, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला १ वर्ष...

आता खेड्यांमध्येही प्ले स्कूल; पंतप्रधानांची घोषणा, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला १ वर्ष पूर्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मंजुरी मिळून गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट भाषण केले. या दरम्यान त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. प्रथम खेड्यांमध्ये मुलांना प्ले स्कूलची सुविधा मिळेल, असे सांगितले. दुसरे म्हणजे ११ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे भाषांतर करण्यासाठी एक टूल विकसित केले गेले आहे. यामुळे या भाषांमधील विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होईल, असे म्हटले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व देशवासीय आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात आपण सर्व लोक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि धोरणकर्ते यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण मैदानात आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. कोरोनाच्या या काळातही लाखों नागरिकांकडून शिक्षक, राज्यांकडून सूचना घेऊन टास्क फोर्स बनवून शिक्षण धोरण राबवले जात आहे.

आज विद्या प्रवेश कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्ले स्कूलची संकल्पना आता गावोगावी पोहोचेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. आतापर्यंत प्ले स्कूल ही संकल्पना फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. येत्या काळात हा सार्वत्रिक कार्यक्रम म्हणून राबवला जाईल आणि राज्येही गरजेनुसार त्याची अंमलबजावणी करतील. श्रीमंत किंवा गरीब, देशाच्या कोणत्याही भागात, याचा अभ्यास हसत-खेळत आणि सहज होईल.

जर आपण हसत प्रारंभ केला तर यशाचा रस्ता सहजपणे पूर्ण होईल, असे पंतप्रधान म्हणाले. एकविसाव्या शतकातील आजच्या तरुणांना स्वत:ची व्यवस्था आणि जग आपल्या हिशोबाने बनवायचे आहे. त्याला एक्सपोजर आवश्यक आहे. त्याला जुन्या बंधने आणि पिंज-यातून मुक्तता हवी आहे. कोट्यवधी तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात विलक्षण कामगिरी करत आहेत, असेही मोदी म्हणाले.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा आता ११ भाषांमध्ये अनुवाद
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे ११ भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी एक टूल विकसित केले गेले आहे. तसेच मला आनंद आहे की ८ राज्यांमधील १४ अभियांत्रिकी महाविद्यालये हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी आणि बांगला या ५ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यास सुरू करणार आहेत.

बिलोलीचे कृषी अधिकारी पसलवाड लाच प्रकरणी चतुर्भुज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या