29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयआता घरापासूनच सामानाची जबाबदारी विमान कंपनीची

आता घरापासूनच सामानाची जबाबदारी विमान कंपनीची

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हवाई प्रवास करण्याºया प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बॅगेजच्या कटीकटीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. इंडिगो या विमान कंपनीने प्रवाशांना डोअर-टू-डोअर सुविधा देण्याची तयारी सुरु केली आहे. आता इंडिगो कंपनी प्रवाशांच्या घरून सामान पिक करून प्रवास संपेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारणार आहे. विमान कंपनीने डोअर-टू-डोअर बॅगेज डिलीव्हरी देण्यासाठी आॅन डिमांड प्लॅटफॉर्म कार्टरपॉर्टरसोबत करार केला आहे. कंपनीने नवी दिल्ली आणि हैदराबादमध्ये १ एप्रिलपासून सेवा सुरु केली आहे. लवकरच मुंबई आणि बेंगळुरुतही ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

इंडिगोने या डोअर-टू-डोअर सुविधेला ६ईबॅगपोर्ट हे नाव दिले आहे. यासाठी प्रवाशांना २४ तासांपूर्वी बुकींग करावी लागेल. घरापासून प्रस्थापित अंतरापर्यंत सामान पोहोचवण्याची जबाबदारी कंपनीची असेल. यामुळे प्रवाशांचा चेक इन काउंटर आणि सुरक्षा तपासासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच एखादी व्यक्ती ठराविक ठिकाणाऐवजी अचानक आलेल्या कामानिमित्त दूसरीकडे जावे लागले. तरी त्यांना आपल्या सामानाची चिंता करण्याची आवश्यकता नाही़ ते सामान त्यांच्या नियोजित ठिकाणी व्यवस्थित पोहोचवले जाणार आहे.

प्रवाशांना द्यावे लागणार अतिरिक्त पैसे
डोअर टू डोअर या सुविधेपासून प्रवाशांना सामानापासून सुटका मिळणार आहे मात्र याकरिता अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहे़ यासाठी प्रवाशांना ६३० रुपये मोजावे लागलीत. यामुळे प्रवाशांना सामान सांभाळण्याची चिंता मिटणार आहे. अतिरिक्त सामान घेऊन जाण्याºया प्रवाशांना फायदा होणार आहे.

दिल्ली, हैदराबादमध्ये सेवा सुरू
डोअर टू डोअर प्रवाशांचे सामान पोहचविण्याची सेवा नवी दिल्ली आणि हैदराबादमध्ये १ एप्रिलपासून सेवा सुरु केली आहे. तर लवकरच मुंबई आणि बेंगळुरुतही ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

सामानाच्या कटकटीपासून सुटका
सामान विसरण्यापासून ते वजन उचलण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. त्यामुळे ही सुविधा इतर ठिकाणीही लवकरात लवकर सुरु व्हावी अशी मागणी आहे.

 

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांना कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या