22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयआता तामिळनाडूत अनिवासी तामिळ विभाग

आता तामिळनाडूत अनिवासी तामिळ विभाग

एकमत ऑनलाईन

चेन्नई : तामिळनाडूत साधारणपणे प्रत्येक निवडणुकीत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांमध्ये सत्तेचा सारीपाट अदलाबदल होऊन फिरत असतो. २०१६ मध्ये बºयाच वर्षांनी पुन्हा सत्ताधाºयांनाच तामिळनाडूने निवडून दिले होते़ पण २०२१मध्ये जयललितांच्या एआयडीएमकेकडून सत्ता घेत ती तामिळी जनतेने द्रमुकच्या झोळीत घातली आणि १० वर्षांनंतर सत्तेत येताच द्रमुकने तब्बल ९ मंत्रालयांची नावंच बदलून टाकली़

जयललिता आणि करुणानिधी या दोघांच्या अनुपस्थितीत झालेली ही तमिळनाडूची पहिलीच निवडणूक. त्यामुळे या निवडणुकीत पारडे कुणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता होतीच. द्रमुकला मतदारांनी कौल दिला आणि करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी जनतेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतानाच स्टालिन यांनी सरकारच्या ९ विभागांचे नामकरण करून टाकले़

कोरोनासाठी ४ हजार १५३ कोटींची घोषणा
याव्यतिरिक्त मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पहिल्याच दिवशी राज्यातल्या २.०७ कोटी कुटुंबांसाठी कोविड रिलीफ फंड म्हणून ४ हजार १५३ कोटींची घोषणा केली. त्यासोबतच आविन दुधाच्या किंमती ३ रुपयांनी कमी केल्या. त्यामुळे स्टालिन यांच्या कामाच्या धडाक्याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

लस होणार पेटंटमुक्त, उत्पादनवाढीला बळ!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या