21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयआता तृतीयपंथीयही बनू शकणार पायलट

आता तृतीयपंथीयही बनू शकणार पायलट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : समाजाकडून बहुतांश वेळा भेदभावाची व हीन वागणूक मिळणा-या तृतीयपंथीय व्यक्तींना आता वैमानिक किंवा पायलट बनण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. मुलकी विमानवाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) याबबातचे दिशानिर्देश जारी केले. देशातील सुमारे ५ लाख तृतीयपंथीयांपैकी इच्छुकांना अटी पूर्ण केल्यावर वैमानिक म्हणून कायदेशीर मान्यता मिळेल.

अमेरिका, इंग्लंड आदी देशांत काही वर्षांपूर्वीच तृतीयपंथीय वैमानिकांना विमान उडविण्यास रीतसर परवानगी देण्यात आली होती. मात्र भारतात काही कायदेशीर बाबींमुळे ती प्रक्रिया रखडली होती. डीजीसीएच्या ताज्या दिशानिर्देशांनुसार वैमानिक पदाची परीक्षा देणा-या तृतीयपंथीयांना त्यांची शारिरीक व मानसिक क्षमता आणि चाचणीतील कौशल्याच्या आधारावर वैमानिकपदाचा परवाना मिळू शकतो. लिंगपरिवर्तन किंवा हार्मोन बदलाचे उपचार घेऊन ज्यांना ५ वर्षे झाली आहेत असे किंवा अन्य तृतीयपंथी उमेदवार वैमानिकपदासाठी अर्ज करू शकतात.

लिंगपरिवर्तनानंतर होणा-या मानसिक परिस्थितीचीही चाचणी घेण्यात येईल. त्यांना डॉक्टरांचे वैध प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याशिवाय डीजीसीएच्या डॉक्टरांचेही फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असेल. जे तृतीयपंथी वैमानिक नोकरी लागल्यावर लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया किंवा हार्मोन उपचार घेतील त्यांना किमान तीन महिने कामावर रूजू करून घेता येणार नाही. या काळात त्यांना ‘अनफिट’ गोषित कले जाईल व त्यानंतर सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना संबंधित विमान कंपन्या पुन्हा वैमानिक म्हणून रूजू करून घेता येऊ शकतात.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या