22.5 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home राष्ट्रीय कोरोनाची आता दुसरी लाट!

कोरोनाची आता दुसरी लाट!

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. मागील १० महिन्यांपासून संपूर्ण जग हतबल झाले आहे. त्यातच आता ब्रिटन, फ्रान्ससारख्या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या एकाच स्ट्रेनपासून जगाची सुटका होत नसताना आता आणखी एका कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

डुकरांमध्ये फैलावणारा कोरोना विषाणू फैलावण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या कोरोनाची बाधा डुक्करांपासून माणसांनाही होत असल्याने अधिक धोका निर्माण झाला आहे.कोरोना विषाणूच्या या स्ट्रेनला स्वाइन एक्यूट डायरिया सिंड्रोम कोरोना (एसएडीएस-सीओवी) म्हणून ओळखले जाते. हा कोरोनाचा विषाणू वटवाघळांमधून आला आणि त्याची माहिती २०१६ मध्ये समोर आली होती.

चीनमधील अनेक डुक्करांना याची बाधा झाली होती.या संशोधनात अमेरिकेतील चॅपल येथील नॉर्थ कॅरिलोना विद्यापीठाच्या संशोधकांनी या संशोधनात सहभाग घेतला होता. या संशोधनानुसार हा विषाणू मानवाचे फुफ्फूस आणि आतड्यांंच्या पेशीत वाढू शकतो. हा विषाणू बिटाकोरोना विषाणू एसएआरएस-सीओवी-२ चा भाग आहे. यामुळे मानवाला श्वसनसंबंधी आजार कोविड-१९ ची बाधा होऊ शकते. एसएडीएस-सीओवी हा एक अल्फाकोरोना विषाणू आहे. जो डुक्करांच्या पोटात आणि आतड्यांमध्ये आजाराचे कारण ठरतो. या विषाणूमुळे जुलाब आणि उल्टी होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

डुक्करांचे मांस खाणा-या देशांना धोका
पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसाार शास्त्रज्ञांनी एसएडीएस-सीओवीच्या संभाव्य धोक्याचे आकलन करण्यासाठी प्रयोगशाळेत परीक्षण केले होते. त्यानंतर हा विषाणू मनुष्याचे यकृत आणि आतड्यांच्या पेशींमध्ये वेगाने वाढू शकतो. डुक्करांचे मांस खाणा-या देशांमध्ये हा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे.

खंडाळा लोहगाव प्रकल्प पुर्ण भरल्याने पर्यटकांची गर्दी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या