26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयआता तिसरी लाट अन् नवा व्हेरिएंटही नाही!

आता तिसरी लाट अन् नवा व्हेरिएंटही नाही!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसतानाच तिस-या लाटेबाबतच्या शक्यता आणि धोक्याची चर्चा केली जाऊ लागली होती. तिस-या लाटेबाबत अनेक शंकादेखील उपस्थित करण्यात आल्या. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना तिस-या लाटेसाठी निर्णायक महिना ठरेल, असे सांगितले गेले होते. मात्र, तज्ज्ञांच्या नव्या दाव्यानुसार कोरोना प्रादुर्भावाच्या आणखी एका लाटेची कोणतीही शक्यता सध्या तर दिसून येत नाही, अशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. मात्र, नागरिकांनी आणखी काही दिवस कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे, असे म्हटले आहे.

पहिल्या आणि दुस-या लाटेतील अंतराचा अभ्यास करता तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येऊ शकते, अशी शक्यता काही वायरोलॉजिस्ट आणि डॉक्टरांनी वर्तवली होती. मात्र, आता तज्ज्ञांनी नव्याने दावा केला असून, त्यांच्या मतानुसार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जीनोम सिक्वेन्सिंग आणि इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार अद्याप व्हायरसच्या म्युटेशनचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. याशिवाय विषाणूचा नवा व्हेरिएंटही समोर आलेला नाही. दरम्यान, सरकार आणि तज्ज्ञांनी फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोविड नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कारण तोवर कोरोनाविरोधी लसीकरणात देशाला मोठे यश आलेले असेल आणि परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने पाहायला मिळेल.

संक्रमणाचे प्रमाण घटले
सार्स-कोव्ह-२ चे जीनोम सिक्वेन्सिंगचे नोडल अधिकारी डॉ. व्ही. रवी यांच्या मतानुसार कोरोनाचे संक्रमण डेल्टा व्हेरिएंटपर्यंत मर्यादित राहिले आहे आणि ते आता कमी होताना दिसत आहे, असे अभ्यासातून समोर आले आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे आणि व्हायरसचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे व्हायरसच्या म्युटेशनचीही शक्यता आता कमी आहे.

सतर्कता महत्त्वाची
सध्या कोरोना संक्रमणाचे प्रमाण घटले असले, तरी अजूनही आपल्याला खूप सतर्क राहण्याची गरज आहे, असे आरोग्य आयुक्त रणदीप डी यांनी म्हटले आहे. जोवर १०० टक्के लसीकरण होत नाही, तोवर कोविड प्रतिबंधन नियमांचे काटेकोर पालन करणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या