27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयआता मतदान कार्डही होणार डिजिटल अत्याधुनिक

आता मतदान कार्डही होणार डिजिटल अत्याधुनिक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : निवडणूक आयोग लवकरच मतदान कार्ड हे डिजिटल स्वरुपात घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मतदान कार्ड आता आधार कार्डप्रमाणे डिजिटल स्वरुपात जवळ ठेवता येणार आहे. सध्याच्या मतदान कार्डहोल्डर्सना हेल्पलाईन ऍपच्या माध्यमातून केवायसी केल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होईल. निवडणूक आयोगाचा मतदारांना ‘इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड’ (ईपीआयसी) ही सुविधा सहज उपलब्ध करून देणे हा हेतू आहे.

निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, नवीन मतदार इंटरनेटवरून आपलं मतदान कार्ड डाऊनलोड करू शकणार आहेत. तसेच, या डिजिटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. याशिवाय मतदान कार्ड मिळण्यासाठी लागणारा उशीर आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये असलेल्या मतदारांनाही याचा फायदा होणार आहे. या निर्णयानंतर मतदार डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करू शकणार आहेत.

परदेशी राहणा-यांना मतदानाची सुविधा नाही
आयोगाच्या निर्णयानंतर रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत असलेले परदेशी मतदार (ओव्हरसीज व्होटर) देखील डिजिटल मतदार कार्ड सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. मात्र परदेशात राहणा-या भारतीयांना मतदानाची सुविधा देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परदेशी भारतीयांनाही मतदान कार्ड दिले जात नाही. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर परदेशी मतदारांनाही त्यांचे ईपीक म्हणजेच डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

मतदार कार्डमध्ये असणार दोन क्यूआर कोड
– डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड (क्यूआर) असतील. या कोडमधील माहितीच्या आधारे, इंटरनेटवरून डाऊनलोड केलेल्या मतदान कार्डद्वारे मतदार मतदान करू शकतील. यामध्ये, क्यूआर कोडमध्ये मतदाराचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग आणि मतदारांच्या फोटोशी संबंधित माहिती असणार आहे.
– त्याच वेळी दुस-या क्यूआर कोडमध्ये मतदार यादीतील अनुक्रमांक वगळता मतदाराचा पत्ता असेल. निवडणूक आयोग यासाठी तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.

उज्ज्वल निरगुडकर प्लॅनेट मराठी च्या सल्लागारपदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या