21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयआता ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार

आता ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार

एकमत ऑनलाईन

बंगळुरु : येत्या काही दिवसात आपल्याला औषधे घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता उरणार नाही. कारण देशातील पहिला व्हिज्युअल लाईनच्या पलीकडे ड्रोनच्या मदतीने औषधांची डिलेव्हरी करण्याच्या प्रयोगाची पहिली ट्रायल ही बंगळुरुपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदनूरमध्ये सुरू होणार आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास आपल्याला थेट ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार आहेत.

बंगळुरू येथील थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स (टीएएस) या कंपनीला मार्च २०२० मध्ये नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) कडून वस्तू ड्रोनच्या सहाय्याने डिलीव्हर करण्यासंबंधीची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे इतर काही परवानग्या न मिळाल्याने हा प्रयोग रखडला होता. मात्र आता या संस्थेला आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर १८ जूनपासून ३०-४५ दिवसांमध्ये चाचण्यांचा पहिला सेट पार पाडणार आहे. प्रख्यात कार्डियाक सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी या चाचण्यांना पाठिंबा दर्शविला असून, नारायण हेल्थ हे टीएएसबरोबर भागीदारी करणार आहेत. या चाचण्या दरम्यान वाहतुकीसाठी वापरले जाणारी औषधे त्यांच्याकडून पुरवली जाणार आहेत.

भारतात उत्सूकता वाढली
टीएएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेन्द्रन कंदासामी यांनी सांगितले की, इतर दोन कॉन्सोर्सियांना देखील या चाचण्या घेण्यास परवानगी मिळाली आहे पण आमचा प्रयोग हा पहिला अधिकृत/कायदेशीर प्रयोग असेल. यात २०१६ पासून आम्ही बरीच प्रगती केली असून ब-याच प्रतीक्षेनंतर आम्हाला बीव्हीएलओएस प्रयोग मॉनिटरींग कमिटी (बीईएससी)कडून या प्रयोगांसाठी परवानगी मिळाली आहे आणि भारतात लवकरच व्यावसायिक ड्रोन डिलीव्हरीचा फायदा घेण्यास उत्सुक आहोत.

१०० तास उड्डाणाची परवानगी
या प्रयोगांदरम्यान कन्सोर्टियम त्यांच्या ड्रोनचे दोन व्हेरियंट वापरेल. मेडकोप्टर (टीउिडढळएफ) आणि टीएएस ऑन डिमांड सॉफ्टवेअर रेनडिंट हे या प्रयोगादरम्यान वापरले जाईल. यापैकी लहान व्हेरियंट असलेले मेडकोप्टर हा ड्रोन १ किलो वजन १५ किलोमीटर अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतो तर दुसरा व्हेरियंट हा २ किलो वजन १२ किलोमिटर अंतरापर्यंत घेऊन जातो. ३०-४५ दिवसांपर्यंत या ड्रोनच्या रेंज आणि सेफ्टीबद्दल चाचणी करीत आहोत. डीजीसीएनुसार आम्हाला किमान १०० तास उड्डाण करावे लागेल. सुमारे १२५ तास उड्डाण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ट्रायलच्या शेवटी नोंदी पुनरावलोकन अधिका-यांना सादर केल्या जातील, असे कंदासामी म्हणाले.

लक्षव्दिपमध्ये १५ नेत्यांचा भाजपला रामराम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या