30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयआता आधार क्रमांकानेही काढा पैसे!

आता आधार क्रमांकानेही काढा पैसे!

नवी सुविधा ; पिनलेस बँकींगला प्रोत्साहन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडते. सरकारी योजनांसोबत ते लिंक करणे गरजेचे झाले आहे. मात्र आता आधार कार्डच्या मदतीने एटीएमकार्डाप्रमाणे पैसे देखील काढता येणार आहेत. मात्र यासाठी आधार कार्ड बँक अकाऊंटशी ल्ािंक असणे गरजेचे आहे. ग्राहक इनेबल्ड पेमेंट सिस्टम सर्व्हिसद्वारे (एईपीएस) बँकेत जमा असलेली रक्कम काढू शकतात. त्यामुळे देशात आता एटीएम कार्ड, पीनशिवाय बँकिंग व्यवहार करता येणार आहेत.

आधार आधारित एटीएम मशीनमधून सुविधा
पैसे काढण्यासाठी आतापर्यंत सर्वच जण एटीएम-डेबिट कार्डच्या मदत घेत होते. पण आता हेच काम आधार कार्डच्या साहाय्याने करता येणार आहे. आधार आधारित एटीएम मशीनद्वारे पैसे काढता येणार आहेत.पैसे काढणे, पैसे भरणे, बॅलेन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट काढणे आणि कर्ज देखील याद्वारे घेता येणार आहे. यासोबतच पॅन कार्ड, ई-केवायसी आणि कर्ज वितरणाच्या सुविधाही याच्यामार्फत दिल्या जाणार आहेत.

आधार आधारित पेमेंट (ऐईपीसी ) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) तयार केले आहे. याद्वारे बँक आणि वित्तिय संस्था आपल्या सेवा देण्यासाठी आधार नंबर आणि यूआयडीएआय आॅथेंटिकेशनचा वापर करतात. याला आरबीआयची देखील मान्यता मिळाली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि फिंगरप्रिंट, डेबिट कार्डप्रमाणे काम करते. त्यामुळे पीन नंबरही टाकावा लागणार नाही.

पॉस मशिनप्रमाणे काम
– आधार मायक्रो एटीएम संशोधित पॉस (पॉइंट ऑफ सेल) डिव्हाईसप्रमाणे काम करते.
– पीनलेस बँकिंगला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे.
– व्यवहारांवर कसलेही शुल्क लागत नाही.
– एटीएमप्रमाणे यात कॅश-इन आणि कॅश-आऊट होणार नाही, तर आधार मायक्रो एटीएमद्वारा हे चालवले जाईल.
– बँक अकाऊंट हे आधार कार्डसोबत लिंक केले असलेली प्रत्येक व्यक्ती या सुविधाचा लाभ घेऊ शकणार आहे.

भारतातील फुटीरतावाद्यांना बळ देऊ; चीनची भारताला धमकी ; ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये लेख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या