25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयआता मेरा रेशन अ‍ॅप व्दारे घर बसल्या मिळणार धान्य

आता मेरा रेशन अ‍ॅप व्दारे घर बसल्या मिळणार धान्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणा-या किंमतीत धान्य मिळावे, यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजना चालविली जाते. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते. परंतु तेथे गर्दी आणि लांब रांगा असल्याने अनेकदा रेशन मिळण्यास अडचण येते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने मेरा रेशन ऍप सुरू केले आहे़ याद्वारे आता आपण घरी बसून धान्य मिळवू शकता.

हे ऍप वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहे. याद्वारे आपण घरी बसून रेशन बुक करू शकता. यासंदर्भात अन्न सचिव सुधांशु पांडे म्हणाले की, एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अ‍ॅपचे उद्दिष्ट आहे. माय रेशन अ‍ॅपचा लाभ घेण्यासाठी प्रथम ते गुगूल प्ले स्टोरवरून ते डाऊनलोड करा. इंस्टालेशननंतर ऍप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्डचा तपशील भरा. असे केल्यावर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण ऍपवरून रेशन मागवू शकता.

ऍपचे फायदे
> या ऍपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, कारण एका शहरातून दुस-या शहरात जाताना त्यांना अनेकदा रेशन सेंटरबद्दल माहिती नसते. परंतु या अ‍ॅपद्वारे या समस्येवर मात करता येईल.
> या ऍपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशन कार्डधारक या ऍपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.
> रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते कार्डधारक या ऍपच्या मदतीने इतर माहिती स्वत: घेऊ शकतील.
> रेशन कार्डधारकांना या ऍपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल ते पाहण्यासही ते सक्षम असतील.

१४ भाषांमध्ये ऍप उपलब्ध होईल
मेरा रेशन ऍप सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच अन्य १४ भाषांमध्येही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारण बहुतेक स्थलांतरित इतर राज्यांमधून आलेत, त्यामुळे त्यांना भाषेची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच त्यांची सोय लक्षात घेऊन त्यामध्ये प्रमुख प्रादेशिक भाषा जोडल्या जातील. जेणेकरून ऍप वापरण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

रोटी बँक चालवणारे किशोरकांत कालवश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या