22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयआयएएफ बेसवर एनएसजी कमांडोज तैनात

आयएएफ बेसवर एनएसजी कमांडोज तैनात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : श्रीनगर आणि जम्मूमधल्या इंडियन एअर फोर्सच्या तळांवर एनएसजी कमांडोज तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी या कमांडोजची तैनाती झाली आहे. एनएसजीचे डायरेक्टर जनरल एम. ए. गणपती यांनी शनिवारी ही माहिती दिली. २७ जूनला पहिल्यांदा जम्मूमधल्या इंडियन एअर फोर्सच्या बेसवर ड्रोन हल्ला झाला होता. सीमेपलीकडून आलेल्या ड्रोनमधून बॉम्बफेक झाली होती. यात एअर फोर्सचे दोन जवान जखमी झाले होते. इमारतीच्या काही भागांचे नुकसान झाले होते.

जम्मू-काश्मीरमधील आयएएफचे हे दोन्ही बेस पाकिस्तान सीमेजवळ आहेत. संवेदनशील स्थळांमध्ये हे दोन्ही तळ मोडतात. हायजॅकचे प्रयत्न हाणून पाडण्यात हे एनएसजी कमांडोज माहीर आहेत. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्यावेळी याच एनएसजी कमांडोजना पाचारण करण्यात आले होते. ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण करण्याची एनएसजीकडे व्युहरचना आहे.

एनएसजी सुसज्ज
ड्रोन विरोधी साहित्य, रडार, जॅमर्स आणि ड्रोन पाडणा-या बंदुकांनी एनएसजी सुसज्ज आहे. जम्मूमधल्या आयएएफ बेसवर हल्ला झाल्यानंतर एनएसजीची टेक्निकल टीम तिथे गेली होती. तिथे त्यांनी आपली सिस्टिम फिट केली आहे. ड्रोन हल्ला हे नवीन आव्हान आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षादलांना आपली क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. शस्त्रास्त्र टाकण्यापासून ते बॉम्बहल्ला ड्रोनच्या सहाय्याने सहजतेने करता येऊ शकतो असे डी.जी. गणपती यांनी बोलताना सांगितले. ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्याच्या ऑपरेशनमध्ये एनएसजी कमांडोज पारंगत असतात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या