34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeउद्योगजगतडिजिटल पेमेंट्सला चालना देण्यासाठी लवकरच एनयूईएस

डिजिटल पेमेंट्सला चालना देण्यासाठी लवकरच एनयूईएस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी ऍमेझॉन, आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक या एनपीसीआयच्या पर्यायाने एकत्र येऊ शकतात. म्हणजेच या तिन्ही कंपन्या नवीन एनयूईएस एकत्र आणण्याची योजना आखत आहेत. सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय यूपीआयद्वारे चालविण्यात येत आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, पाइन लॅब्स आणि बिलडेस्क यांच्यासह तीन संस्थांनी भारतात डिजिटल व्यवहार हाताळण्यासाठी एक नवीन संस्था तयार केली आहे. मार्केटमध्ये याची स्पर्धा एनपीसीआयसोबत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या सर्व डिजिटल व्यवहार एनपीसीआयद्वारे हाताळले जातात. आरबीआयने नवीन किरकोळ पेमेंट सिस्टमसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची घोषणा केली आहे. एनयूईएस आल्यानंतर एनपीसीआयला बॅकफूटवर सुद्धा ठेवले जाऊ शकते.

लवकरच सादर करणार योजना
ऍमेझॉन, आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक एक-दोन दिवसांत आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) समोर आपल्या योजनेची रूपरेषा सादर करणार आहे. दरम्यान, बोली लावण्याची अंतिम मुदत होण्यापूर्वीच ते आरबीआयसमोर सादर करावे लागेल. जर बोली मंजूर झाल्यास याचा अर्थ असा होईल की, जानेवारी २०२१ मध्ये २ बिलियनहून अधिक व्यवहार असलेल्या यूपीआयचे वर्चस्व लवकरच संपुष्टात येईल.

जागतिक दर्जाचे नेटवर्क
इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, “आमचा प्रयत्न जागतिक दर्जाचे नेटवर्क तयार करण्याचा आहे, जे छोट्या उद्योगांना आणि व्यापा-यांना पैसे भरण्यास मदत करेल. यामुळे त्यांचा वेळही वाचणार आहे. गेल्या दोन महिन्यांत या दिशेने जोर पकडला असून सध्या अ‍ॅग्रीमेंट आणि कागदपत्रे बाकी आहेत.

एनपीसीआयची स्थापना २००८ मध्ये झाली होती
एनपीसीआयची स्थापना २००८ मध्ये आरबीआयद्वारे करण्यात आली होती. भारतात किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट प्रक्रियेला चालना देण्यासाठी आरबीआयने ही प्रणाली सुरू केली होती. एनपीसीआयला ५६ बँकांनी पाठिंबा दर्शविला आहे. यासह, यूपीआय आणि रुपे देखील या बँकाद्वारे केले जाते. तसेच, फास्टॅगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंट देखील उपलब्ध आहे.

गलवानचे हिरो कॅप्टन सोइबा यांचा सन्मान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या