23.8 C
Latur
Tuesday, August 4, 2020
Home राष्ट्रीय कोरोनाबाधितांच्या संख्या १७ लाखावर

कोरोनाबाधितांच्या संख्या १७ लाखावर

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा धोका हा दिवसेंदिवस वाढत असून मागील २४ तासात भारतात ५४,७३५ नव्या रूग्णाची भर पडली आहे तर जगभरातील कोरनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून तब्बल सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मागील 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 54,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात ५४,७३५ रुग्ण वाढीसह भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 17 लाखाच्या वर पोहोचाल आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी (1 ऑगस्ट २०२०) देशात 54,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 17,50,723 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 37 हजारांवर पोहोचला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,67,730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 11,45,629 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन हटवल्यानंतर कालपासून देशात अनलॉक-3 च्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे.

Read More  ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नचा गौरवोद्गार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,132FansLike
34FollowersFollow