31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयरुग्णसंख्या ४० लाखांवर, विक्रमी ८६ हजार रुग्ण वाढले

रुग्णसंख्या ४० लाखांवर, विक्रमी ८६ हजार रुग्ण वाढले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत ३१ लाख ७ हजार २२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८ लाख ४६ हजार ३९५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत १ हजार ८९ जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत देशात ६९ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग ८ दिवस दररोज ६० हजारांहून अधिक रुग्ण बरे होत आहेत.

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. ०.५ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रांवर ठेवण्यात आले आहे. ३.५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मृत्यूदर १.७४ टक्के आहे. सलग दुस-या दिवशी ११.७० लाखांहून अधिक नमुना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढत असले तरी दैनंदिन संसर्ग दर ७.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

राज्यात २० हजारांवर नवे रुग्ण
राज्यात आज २० हजार ४८९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर १० हजार ८०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २ लाख २० हजार ६६१ झाली आहे. दरम्यान राज्यात आज ३१२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २६ हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे. राज्यात पुन्हा आज रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४५ लाख ५६ हजार ७०७ नमुन्यांपैकी ८ लाख ८३ हजार ८६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात आज १० हजार ८०१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६ लाख ३६ हजार ५७४ झाली आहे.

जालना जिल्ह्यात जिल्हा बँकेची तिजोरी फोडली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या